सांगोला :
पक्षात अनेक वर्षे संघटना वाढीत निर्णायक काम केलेल्या माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मान्यतेने मुंबई येथील पक्ष कार्यालयात नुकतेच याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना दिले आहे.
यावेळी माजी खासदार व मुंबईचे अध्यक्ष समीर भुजबळ,पक्षाचे कार्यालयीन सरचिटणीस शिवाजीराव गर्जे,प्रवक्ते उमेश पाटील,कार्यालयीन कोषाध्यक्ष संजय बोरगे,सुरेश आबा पालवे,प्रमोद साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते. माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षे पक्ष संघटनेत महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असून यापूर्वी त्यांनी सलग ८ वर्षे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्षपद भूषविले आहे. याशिवाय ६ वर्षे विधान परिषदेचे आमदार, ४ वर्षे राज्याचे उपाध्यक्षपद आणि ३ वर्षे नवी मुंबईचे पक्षाचे निरीक्षक म्हणून ही त्यांनी काम पाहिले आहे. देशात सर्वात जास्त चर्चेत असलेल्या माढा लोकसभा निवडणुकीत प्रचार प्रमुख म्हणून त्यांनी यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडली आहे.पक्षात अनेक वर्षे महत्त्वाची पदे यशस्वीरित्या सांभाळून सोलापूर जिल्ह्यात पक्ष संघटना बळकट करण्यात सिंहाचा वाटा असलेले दिपकआबा साळुंखे-पाटील यांची पुन:श्च जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. संघटना वाढीचा अनेक वर्षांचा अनुभव असलेला खमक्या अध्यक्ष पक्षाला मिळाल्याने सोलापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला गतवैभव मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.
दीपकआबा साळुंखे-पाटील हे यापूर्वी सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष असताना संपूर्ण जिल्ह्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची मजबूत पकड होती.जिल्हा परिषद अध्यक्ष, विधानपरिषदेत स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी, तसेच जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार, स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत संपूर्ण जिल्ह्यात पक्षाचे प्राबल्य व सोलापूर जिल्ह्यातील मतदार संघात असलेल्या लोकसभा मतदार संघातून पक्षाचा खासदार निवडून देण्यात ते यशस्वी ठरले होते. २४ तास पक्षाचे काम करण्याच्या त्यांच्या पद्धतीने सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. पुन्हा एकदा संघटनेतील कामाचा दांडगा अनुभव असलेल्या दीपकआबांचीच जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याने सोलापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस भरारी घेईल, असा विश्वास कार्यकर्त्यातून व्यक्त होत आहे.
————————————————
पदाला न्याय देऊन वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरवणार :
अनेक वर्ष पक्ष संघटनेत काम करण्याचा आपल्याला अनुभव असून आजवर ज्या-ज्या पदांवर काम केले, त्या पदाला न्याय मिळवून देण्याचा प्रमाणिकपणे प्रयत्न केला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ज्या विश्वासाने जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आपल्याला दिली आहे. त्यांचा विश्वास सार्थ ठरवून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपालिका तसेच विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पक्षाचे जास्तीत जास्त प्रतिनिधी निवडून देण्याचा प्रयत्न करणार. – दीपकआबा साळुंखे-पाटील
(नूतन जिल्हाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) ^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
More Stories
भारत-संयुक्त अरब अमिराती संसदीय मैत्री समितीवर खा.धैर्यशील मोहिते-पाटील
सांगोला तालुक्यातील जि.प.व पं.स.च्या अनेक उमेदवारांचा खा.मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
डॉ.परेश खंडागळे यांचे बंधूही लढवणार नगरपालिकेची निवडणूक