सांगोला :
सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, विज्ञान महाविद्यालयामध्ये रविवारी १४ मे रोजी सकाळी १० वाजता ऑनलाईन माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी मंडळाचे सचिव श्रीनिवास येलपले (सर) यांनी केले. पाहुण्यांची ओळख माजी विद्यार्थी समितीचे चेअरमन डॉ.नारायण आदलिंगे यांनी करुन दिली.याप्रसंगी,महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रा.संतोष राजगुरु यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यामध्ये त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपला विकास कसा करावा ? हे सांगितले. यावेळी, महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थीनी प्रा.सौ.विद्या शिंदे (अनगर कॉलेज, अनगर) यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिकंदर मुलाणी यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयाची पार्श्वभूमी व महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश याचा थोडक्यात आढावा घेतला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा निबंधक (वर्ग-१) विलास कोळेकर यांनी आपले विचार व्यक्त करताना, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेवर जास्त भर द्यावा,असे सांगितले. अध्यक्षपदावरुन बोलताना राज उद्योग समूहाचे उद्योगपती दादासाहेब अनुसे यांनी, विद्यार्थ्यांनी यशस्वी व्यवसाय कसा करावा ? हे स्वतःचे उदाहरण देऊन सविस्तर सांगितले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.किसन पवार यांनी केले तर,कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.दिपक शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ऑनलाईन व टेक्निकल विभागासाठी डॉ.जे.व्ही ठोंबरे व मोईन कादरी यांनी विशेष परिश्रम घेतले.
—————————————
हा मेळावा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिकंदर मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थी समितीचे चेअरमन डॉ.नारायण आदलिंगे,माजी विद्यार्थी मंडळाचे सचिव श्रीनिवास येलपले (सर), माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद पवार,माजी विद्यार्थी समितीचे सदस्य प्रा.किसन पवार, डॉ.दिलीप कसबे, डॉ. जगन्नाथ ठोंबरे, प्रा.बाळासाहेब सरगर,प्रा.जावेद शेख, प्रा.दिपक शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
—————————————————————————
More Stories
माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे किशोरी साठी ‘प्रेम,मैत्री व आकर्षण’ कार्यक्रम संपन्न
मरायला नाही तर,जगायला खूप हिंमत लागते – प्रा.डॉ.सुनिता बोर्डे-खडसे
अभिनव पब्लिक स्कूलमध्ये ‘अभिनव बिग बझार’ उपक्रम उत्साहात संपन्न