सांगोला :
शहरी दारिद्र्याचे प्रमाण कमी करण्यासाठी सन २०१४-१५ पासून कार्यान्वीत झालेली दि.अं.यो.राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM) ही केंद्र पुरस्कृत योजना सांगोला नगरपरिषद राबवित असून शहरातील दारिद्र्य रेषेखालील महिलांचे जीवनमान उंचाविण्याच्या दृष्टीने नगपरिषद स्तरावर महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली असून सांगोला नगरपरिषदेच्या माध्यमातून धनश्री व श्री माऊली स्वयंसेवी महिला बचत गटास पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत (पीएफएमई) बुधवारी नगपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांचे हस्ते अनुक्रमे ३ लाख रुपये व ३ लाख ६० हजार रुपये असे एकूण ६ लाख ६० हजार रुपये एवढे बीज भांडवलरुपी धनादेशाचे वाटप करण्यात आले.
केंद्र शासनाकडून सुरु असलेल्या पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने (पीएफएमई) अंतर्गत सदर बचत गटांना व्यवसाय सुरु करण्यासाठी बँकेच्या माध्यमातून सवलतीच्या व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.सदर गटांना बीज भांडवल तसेच एकूण प्रकल्प किंमतीच्या ३५ टक्के आणि कमाल १० लाखापर्यंत“क्रेडीट लिंक्ड सबसिडी” आधारावर अनुदानाचा लाभ मिळतो. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ शहरासह ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनाही घेता येतो. नव्याने स्थापित होणाऱ्या किंवा सद्य:स्थितीत कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना विस्तारीकरण,स्तरवृद्धी आधुनिकीकरणासाठी बँक संलग्नित अनुदान देण्याची तरतूद या योजनेत आहे.
सांगोला नगरपरिषदेकडून बीज भांडवल देण्यात आलेला धनश्री महिला बचत गट हा उन्हाळी खाद्य पदार्थ तसेच पापड या गोष्टींचा व्यवसाय करतो तर, श्री माऊली बचत गट हा शेवया उत्पादन व विक्री करतो. सदर धनादेश वाटपाप्रसंगी, धनश्री व श्री माऊली बचत गटाच्या अध्यक्षा सारिका दिनेश सावळे, सचिव सौ.मंगल ज्ञानदेव धांडोरे, सौ.अनिता प्रशांत धांडोरे,सौ.जयश्री अर्जुन लगड, सौ. सरुबाई अर्जुन लगड इ.सदस्य तसेच या योजनेचे काम पाहणारे सहा.प्रकल्प अधिकारी योगेश गंगाधरे व समुदाय संघटक बिराप्पा हाके हे उपस्थित होते.
—————————————————————————
बचत गटातील महिला आपल्या पायावर आर्थिकदृष्ट्या सक्षमपणे उभे राहत आहेत :
सांगोला शहरातील नगरपरिषदे अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या बऱ्याच बचत गटातील महिला या आज विविध व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या पायावर आर्थिकदृष्ट्या सक्षमपणे उभे राहत आहेत. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने (पीएफएमई) अंतर्गत ज्या कोणा वैयक्तिक अथवा बचत गटांना “क्रेडीट लिंक्ड सबसिडी” आधारावर अनुदानाचा लाभ घ्यावयाचा आहे, त्यांनी दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कक्ष, नगरपरिषद येथे संपर्क साधावा. – मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी
—————————————————————————
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने