आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठक संपन्न
सांगोला :
उन्हाळ्याच्या प्रारंभीच आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे माण नदीला पाणी आल्याने शेतकरी सुखावला असून सध्या टेंभूचे आवर्तन सुरु आहे.तर,आम.डॉ.देशमुख यांनी केलेल्या मागणीनुसार, पिण्याच्या पाण्यासाठी व पशुधनासाठी टेंभू योजनेतून माण नदीवरील सर्व बंधारे त्वरित भरुन द्यावेत,असे आदेश जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रशासनाला दिले असल्याची माहिती आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी दिली.
टेंभू योजनेच्या उन्हाळी आवर्तनाचे नियोजन करण्यासाठी मुंबई येथे जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासमवेत मंगळवारी ४ मार्च रोजी बैठक पार पडली.यावेळी आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्यासह प्रशासनाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

सध्या टेंभूचे आवर्तन सुरु असून ऐन उन्हाळ्यात सांगोला तालुक्यातील माण नदीला पाणी आल्याने शेतकरी सुखावला होता. खरीप हंगामातील पिकांना जीवदान देण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांचा पाठपुरावा सुरु असून पुणे येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतही पाणी सोडण्याची आक्रमक मागणी त्यांनी केलेली होती.
——————————————————————
ना.राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या कडक सूचना :
सांगोला तालुक्यातील खवासपूर ते मेथवडेपर्यंतचे सर्व बंधारे पुरेशा पाण्याने भरुन द्यावेत.टेंभूच्या आवर्तनाचे पाणी सर्व गावांना व्यवस्थित देऊन माण नदीवरील सर्व बंधारे त्वरित भरुन द्यावेत. तसेच पाणी आवर्तनात होणारी पाणी गळती टाळण्याच्या दृष्टीनेही जलसंपदा विभागाने उपायोजना कराव्यात,अशा कडक सूचना राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी कृष्णा खोरे विकास महामंडळ) ना.राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या. – आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने