उद्या महूदमध्ये धडाडणार खा.संजय राऊतांची तोफ
खा.राऊतांच्या रडारवर असणार शहाजीबापूंसह महाविकास आघाडीचे बंडखोर

सांगोला :
सांगोला विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या प्रचारार्थ उद्या सोमवारी दुपारी महूदमध्ये शिवसेनेचा बुलंद आवाज व फायरब्रँड नेते खा.संजय राऊतांची तोफ धडाडणार असून खासदार राऊतांच्या रडारवर विशेष करुन तालुक्याचे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांचेसह महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवारही असणार त्यामुळे, या प्रचारसभेत खा.राऊत हे त्यांचेवर कोणता निशाणा साधणार ? काय बोलणार ? याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.
सांगोला विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या प्रचारार्थ उद्या सोमवारी १८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता सांगोला तालुक्यातील महूद ग्रामपंचायतीच्या शेजारील नवीन बाजार पटांगणावर शिवसेनेचे फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या सभेसाठी सांगोला विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक यांनी उपस्थित रहावे,असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा.पी.सी. झपके,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ.धनंजय पवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे,शिवसेनेचे तालुका प्रमुख अरविंद पाटील यांनी केले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खा.संजय राऊत हे महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या प्रचारासाठी सोमवारी १८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता महूद (ता.सांगोला) येथे येणार आहेत. महूद येथील ग्रामपंचायतीच्या शेजारी नवीन बाजार पटांगणावर खासदार संजय राऊत यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षाच्या उमेदवारांना लक्ष्य केले आहे.त्यामुळे, विधानसभा प्रचारात शिवसेना नेते अधिक आक्रमक झाले आहेत.सांगोल्यात महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दीपकआबा साळुंखे-पाटील यांना उमेदवारी दिली असून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे दीपकआबांच्या प्रचारासाठी महूदमध्ये येणार आहेत.या प्रचार सभेत संजय राऊत हे शहाजीबापू यांचेसह बंडखोरावर कोणता निशाणा साधणार ? याकडे आता, कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
——————————————————————————