सांगोला :
भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्या मालट्रक चालकाने एस.टी.ची वाट पाहत थांबलेल्या मजूर महिलांना चिरडल्याने सांगोला तालुक्यातील कटफळ येथील ६ महिलांचा मृत्यू झाला असून १ महिला गंभीर जखमी झाली आहे.या दुर्दैवी घटनेबाबत आमदार शहाजीबापू पाटील यांनी दुःख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत तसेच जखमी महिलेच्या उपचारासाठी २५ हजार रुपयांची व्यक्तिगत मदत जाहीर केली आहे.
मंगळवारी १८ जून रोजी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास पंढरपूर-कराड रोडवरील चिकमहूद जवळ (बंडगरवाडी पाटी) येथे रोजंदारीने कामाला जाणाऱ्या ६ मजूर महिलांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने कटफळ गांवासह तालुक्यावर शोककळा पसरली असून या अपघातात अश्विनी शंकर सोनार,इंदुबाई बाबा इरकर,श्रीमाबाई लक्ष्मण जाधव,कमल यल्लाप्पा बंडगर,सुलोचना रामा भोसले,मनीषा आदिनाथ पंडित (सर्व रा.कटफळ,ता.सांगोला) यांचा मृत्यू झाला.तर, मीनाबाई दत्तात्रय बंडगर (वय ५०,रा.कटफळ) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर पंढरपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आमदार शहाजीबापू पाटील यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले असून त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची तसेच जखमी महिलेच्या उपचारासाठी २५ हजार रुपयांची व्यक्तिगत मदत जाहीर केली आहे.तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून मृतांच्या नातेवाईकांना अधिकची मदत मिळवून देण्यासाठीही प्रयत्नशील असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी यावेळी सांगीतले.
——————————————————————————
More Stories
गावागावात,क्लस्टर स्तरावर शेतमाल खरेदी केंद्रांचे जाळे विस्तारुन ‘प्राईस डेफिशियन्सी पेमेंट’सारखी प्रणाली लागू करावी – खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांची केंद्र सरकारकडे मागणी
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर