यापुढे राजकारणात भाग न घेता केवळ वैद्यकिय सेवाच बजावणार – डॉ.परेश खंडागळे

सांगोला :
मागील अनेक वर्षापासून वैद्यकीय,सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत राहून रुग्णांची सेवा करत यापूर्वी मी भारतीय जनता पक्षाचे काम करत होतो व कांही निवडणुकाही लढवल्या होत्या. परंतु,माझेवरील रुग्णांचा वाढता विश्वास पाहता, रुग्णांची सेवा करण्याचा मी वसा घेतला असून रुग्णांची सेवा करण्यास कटिबध्द आहे.त्यामुळे यापुढे मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही तसेच कोणत्याही एका राजकीय पक्षाशी माझा कांहीही संबंध राहणार नाही आणि यापुढे राजकारणात भाग न घेता मी केवळ वैद्यकिय सेवाच बजावणार असल्याचा संकल्प सांगोला येथील खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ.परेश खंडागळे यांनी जाहीर केला आहे.
सांगोला येथील प्रतिथयश डाॅ.परेश खंडागळे यांनी यापूर्वी स्वत:चे हाॅस्पीटलमध्ये व सांगोला शहरातील विवीध हाॅस्पीटलमधून अगदी प्रामाणिकपणे वैद्यकिय सेवा बजावली असून सांगोला,मंगळवेढा,जत, आटपाडी,कवठेमहांकाळ आदी भागातील अनेक रुग्णांना विवीध प्रकारच्या व्याधीतून जीवदान दिले आहे. अलिकडेच सांगोला शहरातील त्यांच्या स्वत:च्या २४ तास सेवा देणार्या आणि सर्व सोईसुविधांनी युक्त अशा खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा शुभारंभ करण्यात आला आहे.
या खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून “यापुढे मी वैद्यकीय,सामाजिक,आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रामाणिकपणे सेवा बजावणार असून जनतेच्या सेवेसाठी तसेच रुग्णांच्या सेवेसाठी अहोरात्र काम करण्यास मी कटिबध्द राहीन आणि यापुढे राजकारणात भाग न घेता केवळ वैद्यकिय सेवाच बजावणार असल्याचा संकल्प” सांगोला येथील खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ.परेश खंडागळे यांनी जाहीर केला आहे.
——————————————————————————