रोटरी क्लबच्या वतीने अजनाळेत स्मार्ट टीव्ही व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ई लर्निंग ॲप प्रदान
सांगोला :
सांगोला तालुक्यातील अजनाळे येथील विकास विद्यालय ही एक उत्तम शाळा असून या शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मदत व्हावी,या उद्देशाने सांगोला रोटरी क्लबच्या वतीने स्मार्ट टीव्ही व दहावीच्या मुलांसाठी ई लर्निंग ॲप प्रदान करण्यात आले.
यावेळी बोलताना,अँड.रो.विशाल बेले म्हणाले की,रोटरी क्लबने दिलेल्या या साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांनी आपली गुणात्मक वाढ करावी,असा संदेश दिला.तर,रोटरीचे अध्यक्ष डाॅ.साजिकराव पाटील यांनी “यापुढे टीव्हीच स्मार्ट न राहता मुले स्मार्ट व्हावीत”अशी अपेक्षा व्यक्त केली.यासमयी,संस्थेच्या अध्यक्षांनी रोटरीच्या या कामाबद्दल आभार मानले व अशाचप्रकारे ग्रामीण भागातील समस्या व गरजांविषयी रोटरी क्लबने नेहमी लक्ष द्यावे,अशी अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी,संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष प्रल्हाद सोपान येलपले,माजी मुख्याध्यापक शामराव कोळवले सर, विद्यमान मुख्याध्यापिका कोळवले मॅडम तसेच रोटरीचे अध्यक्ष डॉ.साजिकराव पाटील,माजी नगराध्यक्ष रो. मधुकर कांबळे,इंजि.रो.संतोष भोसले,इंजि.रो. हमीदभाई शेख,रो.विकास देशपांडे,इंजि.रो.अशोक गोडसे,अँड.रो.विशाल बेले,रो.श्रीपती आदलिंगे इ.रोटरी क्लबचे सदस्यही उपस्थित होते.
—————————————————————————