सांगोला :
उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न येत्या काळात निर्माण होऊ शकतो.त्यामुळे सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील गांवांना शेती पिकासाठी सिंचन उपलब्ध करुन एप्रिल महिन्यात नियोजनबध्द पध्दतीने आवर्तन सुरु करण्यात यावे.तसेच शेतकऱ्यांच्या पिकासाठी टेंभू व म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून हक्काचे उन्हाळी सिंचन आवर्तन माण नदीमध्ये लवकरात लवकर तातडीने सोडण्याची आग्रही मागणी सांगोल्याचे आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी केली.
टेंभू व म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून माण नदीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकासाठी उन्हाळी सिंचन आवर्तन सोडण्याकरता काल मंगळवारी मुंबई येथील विधानभवन येथे जलसंपदा मंत्री नाम.राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.जयकुमार गोरे व नाम. चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.या बैठकीत बोलताना आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी ही आग्रही मागणी केली.
सदर बैठकीसाठी आ.सुरेश खाडे,आ.रोहित पाटील, आ.समाधान अवताडे,आ.गोपीचंद पडळकर, आ.सुरेश बाबर तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
——————————————————————
१० एप्रिलपासून आवर्तन सुरु करण्याचे दिले आदेश :
आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी केलेल्या आग्रही मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शेतकऱ्यांसाठी येत्या १० एप्रिल पासून पीक सिंचन आवर्तन सुरु करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री नाम.राधाकृष्ण विखे-पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सदर बैठकीत दिले.
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने