सांगोला :
डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष व निर्भीड पत्रकार सतीशभाऊ सावंत यांना टेंभू (ता.कराड) येथील इंद्रधनु विचार मंच फाउंडेशनचा सुधारककार गोपाळ गणेश आगरकर राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला असून १४ जुलै रोजी टेंभू येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
सतीशभाऊ सावंत हे दोन दैनिके यशस्वीपणे चालवत असून सलग 25 वर्षे पत्रकारितेचा अनुभव असलेले निर्भीड व धाडसी पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक नवोदित पत्रकार त्यांनी घडवून त्यांच्या लेखणीला वाव दिला आहे. अतिशय निर्भीडपणे लिखाण करून त्यांनी गोरगरीब,वंचित व उपेक्षितांना न्याय देऊन विकासाला चालना देण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. जनतेच्या प्रश्नावर सातत्याने त्यांनी परखडपणे आवाज उठविला आहे. इंद्रधनु विचार मंच फाउंडेशन कराडच्या वतीने सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील टेंभू गावचे सुपुत्र थोर पत्रकार सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या १६७ व्या जयंती दिनानिमित्त राज्यातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियातील उत्तुंग कामगिरी करणार्या पत्रकार तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करणार्या पाच मान्यवरांना गोपाळ गणेश आगरकर सुधारक राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. टेंभू,ता.कराड येथे शुक्रवार दि.१४ जुलै रोजी सकाळी राज्यातील प्रमुख मान्यवरांचे हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. राज्यस्तरीय थोर पत्रकार गोपाळ गणेश आगरकर सुधारक पुरस्कार सतीशभाऊ सावंत यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
—————————————————————————
More Stories
घरपट्टीत कसलीही दरवाढ नाही,ही तर वाढीव बांधकामामुळे करवाढ – नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने
दुष्काळी सांगोला तालुक्याला पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी त्वरित सोडावे – माजी आमदार दीपकआबा
स्व.आ.गणपतराव देशमुख यांच्या स्मृतीदिन व जयंती दिनानिमित्त सांगोल्यात विवीध कार्यक्रमांचे आयोजन